या गाण्यांची, गज़लांची ....मज़ा लुटूया !

शुक्रवार, २८ मे, २०१०

दिले नादान तुझे हुआ क्या है.......


दिले नादान तुझे हुआ क्या है....
ही ग़ालीबची गज़ल माहीत नसणारा माणूस भारतात मिळणे कठीण. याचा अर्थ खरच समजवून घ्यायचा असेल तर आपल्याला सुफी संप्रदायाबद्दल थोडीशी माहीती करुन घ्यायला लागेल.
आपण ही माहीती या सारख्या गज़लेच्या आणि गालीब सारख्या कवींच्या बाबतीतच फक्त करुन घेऊ. सुफी संप्रदायावर मी लवकरच www.jayantpune.wordpress.com वर लिहीणार आहे त्यात  आपल्याला अधिक माहीती मिळेळ.

सुफी संप्रदायाच्या मते आपल्या अध्यात्माच्या प्रवासात आपल्याला सात टप्पे ओलांडावे लागतात. या प्रवासाला ते मार्ग म्हणतात आणि जो हे करायचा प्रयत्न करतो त्याला सालिक म्हणतात. हा शब्द जर एखाद्या गज़लेमधे आला तर त्याचा या दृष्टीकोनातून अर्थ जरुर लावायचा प्रयत्न करायला हवा. अशा या सालिकला परमेश्वराचे ज्ञान म्हणजे मरिफत मिळवण्यासाठी योग्य शिकवण देणे हाच सुफींचा मुख्य हेतू आहे. या प्रत्येक टप्याला मुक्कामात म्हणतात. या प्रवासात आलेल्या अनुभवांना अहवाल तर जो मार्ग अनुसरला जातो त्याला अतरिकन. फनाफिल हकीकत म्हणजे शेवट – परमात्म्यात विलीन होणे. हे सात टप्पे कोणते ?
१ "उबदियात" म्हणजे सेवा. यात पश्चाताप होतो.
२ "इष्क" म्हणजे प्रेम. या टप्प्यात परमात्म्याची ओढ लागते.
३ "जोहद" म्हणजे त्याग किंवा निवृत्ति
४ "मरिफत" म्हणजे खरे ज्ञान. यात परमेश्वर सोडून बाकी सर्व भौतिक गोष्टींचा त्याग अभिप्रेत आहे. हे ज्ञान मिळवायचे दोन मार्ग आहेत. एक इल्मी म्हणजे ग्रंथ वाचून आणि दुसरा हाली म्हणजे ध्यान-धारणेतून.
५ "वजद" म्हणजे उन्मानावस्था. यात परमेश्वराचे ध्यान करत असता उन्माद अवस्था प्राप्त होते.
हकीकत मधे साधकाच्या आत्म्याला परमेश्वराला शरण जाण्याची महती पटते. याला म्हणतात तवक्कुल तोच एकमेव सत्य आहे हे उमजणे याला म्हणताततौहिद
७ "वसल" म्हणजे मिलन. या टप्प्यावर साक्षात्कार होतो. यानंतर फ़ना व बखा म्हणजे स्वत:ला विसरुन जायचे व परमेश्वरात विलीन व्हायचे. हा श्रध्देचा उच्च बिंदू समजला जातो. याच्या नंतर परमेश्वर करेल ती पूर्व असेच समजले जाते.

मुस्लीम धर्ममार्तंडाच्या मते गायन हे निषिध्द आहे तसेच गुरुंच्या पायावर डोके ठेऊन वंदन करणे.  पण सुफींनी परमेश्वराच्या स्तुती गायनाला परवानगी दिली आणि गुरुंना वंदन करायलाही परवानगी दिली. या गायनाला म्हणतात समा आणि वंदनाला सिजदा”. त्या साठी त्यांनी एक युक्ती केली. सिजदा दोन प्रकारचा असतो हे सिध्द केले. एक सिजदा इबाद्ती आणि दुसरा ताज़िमी. पहीला हा परमेश्वरासाठी आणि दुसरा हा आदर व्यक्त करण्यासाठी.

कर्मठपणा हा मुळत: माणसाला आवडत नसल्यामुळे, मुसलमान राजांनी सुफी संप्रदायाला जो थोडाफार आश्रय दिला. पण तो त्यांच्या समाधानासाठी. सामान्य लोकांसाठी त्यांनी कर्मठ धर्माचीच कास धरलेली दिसते. असो. आता आपल्या गज़लकडे वळूया.

ग़ालीब हा सुफीसंप्रदायाचा होता त्या मुळे त्याच्या काव्यात गुढपणा पुरेपूर उतरला आहे. वरचा सामान्य अर्थ खरवडला की आत आपल्याला वरचे सात टप्पे दिसतात. बघा त्याच्या या आणि इतर काव्यात आपल्याला त्या दिसतात का ?

दिले नादान तुझे हुआ क्या है
आखिर इस दर्दकी दवा क्या है..
( हे माझ्या मना तुला काय झाले आहे ?
तुझ्या या वेदनांचे औषध काय आहे ?)

हम है मुश्ताक और वो बेजार,
या ईलाही ये माज़रा क्या है....
(इकडे तुला भेटण्याची मला तीव्र इच्छा आणि तू नाखूष, माझ्यावर रागावलेला,
हे परमेश्वरा हा मामला आहे तरी काय ?)

मै भी मुहमे जुबां रखता हूं
काश पुछो की मुदआ क्या है
(माझी पण मते आहेत,
पण खरा मुद्दा काय आहे ?) याच्यात फार गहन अर्थ दडलेला आहे.

जब की तुझबीन नही कोई मौज़ूद,
फिर ये हंगामा-ए-खूदा क्या है.
(जर सगळे तुझ्यातच सामावलेले आहेत तर
तुझ्या अस्तीत्वाबद्दल हा वाद कसला ?)

ये परी चेहरा लोग कैसे है
गमज़ा-ओ-इश्व-ओ अदा क्या है
(हे परी सारखे सुंदर लोक असे कसे आहेत,
त्यांच्या या गमजा आणि अदात काय विशेष आहे ?)

शिकन-ए-ज़ुल्फ-ए अंबारी क्या है
निगाहे-चष्म-ए सुरमासा क्या है?
(हे कुरळे केस आम माणसात एवढे प्रिय का ?
या सुरमा घातलेल्या डोळ्यात एवढे काय आहे ?)

सब्ज-ओ-गुल कहांसे आये है
अब्र क्या चिज है हवा क्या है..
(ही हिरवळ कुठून आली
आणि हे ढग, ही हवा कोणी जन्माला घातली ?)

हमको उनसे वफ़ासे है उम्मीद
जो नही जानते वफ़ा क्या है ?
(आम्हाला त्यांच्या प्रामाणिकपणाकडून अपेक्षा आहेत,
पण त्यांना प्रामाणिकपणा म्हणजे काय हे माहीती असायला पाहिजे ना !)

भला कर तेरा भला होगा
और दर्वेश की सदा क्या है ?
(चांगले कर्म कर, तुझे चांगलेच होईल
माझ्या दर्वेशीचे अजून काय आशिर्वाद असणार ?)(दारोदार हिंडणारे ते दर्वेशी. यांना समाजात चांगला मान असायचा.)

जान तुमपर निसार करता हूं
मै नही जानता दुंआ क्या है
(मी तर तुझ्यावर माझे प्राण अर्पण करायला तयार आहे,
जरी मला तुझा आशिर्वाद काय हे माहीत नाहीत तरी ही)

माना की कुछ नही ग़ालीब
मुफ्त हात आये तो बुरा क्या है......
(मानलं की मी काही विशेष नाही,
पण मी माझे ज्ञान तुम्हाला फुकट वाटतोय तर त्यात वाईट काय आहे ?
तुमचा तोटा काय आहे ?)
दिले नादां तुझे हुआ क्या है.......
साध्या अर्थासाठी -

Get this widget | Track details |         eSnips Social DNA

गुढ अर्थासाठी ऐका -

Get this widget | Track details |         eSnips Social DNA

आवडला हा भावार्थ तर जरूर कळवा.
जयंत कुलकर्णी.

गुरुवार, २० मे, २०१०

ज़िंदगी

निराशेत मनात काय काय विचार येतात, खरंच सांगणे कठीण आहे. एकदा का मन निराशेच्या गर्गेत कोसळले की मग विचारायला नको. विचारच निराशांच्या वेढ्यात सापडले की मनाचा आभिमन्यू होतो. मग साहीर म्हणतो " हे जीवन जुलूम आहे, परमेश्वराच्या हातातील खेळणे आहे ( जब्र : सर्व काही देव तर करतो हा सिध्दांत), माझ्या ह्रदयाची तक्रार आहे, माझ्या आत्म्याचा विलाप आहे.... किती दु:ख सहन केले असेल ... दु:खाची परीसीमा गाठल्यावरच असे काव्य जन्माला येते. 
नंतरच्या कडव्यात मनाची समजूत घातली आहे. आपले नशीबच असे असेल तर तक्रार कशाला ? सालिकेसे म्हणजे एखाद्या मुसाफ़ीराप्रमाणे उरलेले आयुष्य काढेन मी. माझ्या इच्छा आकांक्षांचा जर पदोपदी ठोकरल्या जाताएत तर त्यातून होण्यार्‍या वेदनांचे काय घेऊन बसलाय ....
दुख:त सुध्दा गत आयुष्यातल्या चांगल्या आठवणी तग धरुन मनात आहेत. त्याचाच आधार आहे आता.
आज अगर कापती पलकों को दिये है आंसू

कल थिरकती हुए होटों को हसी भी दी थी....
 

शेवटी माणूस निरशेच्या गर्गेतून छोट्याशा उजेडाच्या तुकड्याकडे बघतोच आणि त्याच्या मनाला परत एकदा पालवी फुटते. आशा निराशेचा खेळ हा असा असतो मित्रांनो !

ज़िंदगी ज़ुल्म सही जब्र सही गमही सही
दिलकी फ़रियाद सही रुहका मातमही सही
ज़िंदगी ज़ुल्म सही....
हमने हर हालमें जिनेकी कसम खाई है
अब यही हाल मुक्कदर है तो शिकवा क्यू हो
हम सालिकेसे निभा देंगे जो दिन बाकी है
चाह रुसवा ना हुई दर्दभी रुसवा क्यू हो
ज़िंदगी ज़ुल्म सही..... 
हमको तकदीरसे बे वज़ह शिकायत क्यू हो
इसी तकदीरने चाहतकी खूषीभी दी थी
आज अगर कापती पलकों को दिये है आंसू
कल थिरकती हुए होटों को हसी भी दी थी....
जिंदगी जुल्म सही......
हम है मायूस मगर इतनेभी मायूस नही
एक ना एक दिन तो यह अष्कोंकी लडी तुटेगी

एक ना एक दिन तो छटेंगे यह गमों के बादल
एक ना एक दिन उजाले की किरन फुटेगी
जिंदगी जुल्म सही.....
 

ऐका आणि हरवून जा या गाण्यात आणि त्यातल्या भावनांमधे............. 
 
कवी : साहीर लुधियानवी
संगीतकार : खय्याम.
गायीका : सुमन कल्यानपूर.
प्रत्येक कडव्याच्या शेवटी हवेत विरत जाणारी एक धून मला विलक्षण आवडते. गाण्याच्या शेवटी ती थोडा जास्त वेळ रेंगाळते. सुंदर, हळवा आवाज, जणू काही आपलेच गाणे कोणीतरी गातेय............

जयंत कुलकर्णी.





मंगळवार, १८ मे, २०१०

हस्रतोंके मज़ार......

हसरतोंके मज़ार !
वाट बघण्यात अर्धी रात्र गेली. पहाटेची चाहूल लागत आहे पहाटेचा गारवा सगळीकडे जाणवतोय पण मला माझे एक क्षणभरही डोळे मिटून दिले नाहीस, काय म्हणावे तुला ? आतातरी मला जरा डोळे मिटू देत ! हे माझ्या धडधडणार्‍या, तडपणार्‍या ह्रदया मला जरा झोपू देत ! बास झालं हे वाट बघणं. यात वेदनेशिवाय काय आहे ?
एवढे तुला समजवून सांगितले तरी तू मात्र त्याची वाट बघतोच आहेस. जराशी तरी चाहूल लागली तरी तू परत जागा होतोस, तडपतोस, कसा विश्वास ठेवतोस तू या मायाजालावर ? तू झोप आणि मलाही झोपू देत बाबा आता ! याची वाट बघण्यात मला इतक्या वेदना झाल्यात की माझ्या डोक्यात या वेदनांची थडगी झालीत की काय असा मला संशय येतोय ! मला त्याच्या शिवाय काहीच सुचत नाही, मला कळतंय हे सगळे फसवे आहे, पण काय करू? या वाट बघण्याशिवाय मी काय करु शकते............

हो चूका इन्तज़ार सोने दे
ऐ दिल-ए-बेकरार सोने दे...
हो चूका इन्तज़ार सोने दे

आहटोंके फ़रेबमे मत आ
आहटोंके फ़रेबमे मत आ
उनका क्या ऐतबार सोने दे,
ऐ दिल-ए-बेकरार सोने दे
हो चूका इन्तज़ार सोने दे...........

बन गये थे हमारे सिनेमें
बन गये थे हमारे सिनेमें
हसरतोंके मज़ार सोने दे...
ऐ दिल-ए-बेकरार सोने दे





हे जे शब्द आहेत, त्याचा अर्थ आत कुठेतरी भिडायला असाच आवाज लागतो. ऐका हे गाणे, अशा आवाजात जो तुम्ही कधीही विसरु शकणार नाही. इकबाल बानोच्या आवाजात. फार गुणी गायीका होती ती. नुकतीच अल्लाला प्यारी झाली. भारतातून पाकिस्तानात गेल्यावर तिची फारशी कदर झाली नाही हे तिचे दुर्दैव ! तिची ७/८ गाणी आपल्याला माहीत असतीलच..........नसतील तर तुम्हाल ऐकवीन म्हणतो.....

जयंत कुलकर्णी.