या गाण्यांची, गज़लांची ....मज़ा लुटूया !

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

वो सांस हूं, लबोंपे जो आया नही अभी.....

रफीसाहेबांची अनेक गैरफिल्मी गाणी आपल्याला माहीत आहेत, असतील. त्याची मजा काही औरच आहे. मुख्य म्हणजे कमीत कमी संगीत व ह्रदयाला भिडणारा त्या गाण्यांचा अर्थ आणि सरळ ह्रदयात एखादी सुरी उतरावी तसा मनाला भिडणारा साहेबांचा आवाज...... त्यातच त्या गाण्यात  भावनांची तडफड असेल तर ते गाणे खरच ह्रदय कापत जाते. असेच एक गाणे....
संगीत : खय्याम १९४५.

वो सांस हूं,
लबोंपे जो आया नही अभी
आया नही अभी....
वो दर्द हूं जो दिलमे समाया नही अभी...
समाया नही अभी...
आता है ग़ुफ्तगू का खलिफा निगाहको...
ये मुज्दा तो मैने दिखाया नही अभी...
दिखाया नही अभी.....
लब्जोंमे आ रही है मेरे दिलकी धडकने..
पहलूमें तुमने मुझको बिठाया नही अभी..
बिठाया नही अभी...
क्यु तंग गया....
हुरूरे बुलंदीसे आसमान.....
सिजदे को मैने सर को झुकाया नही अभी...
झुकाया नही अभी...
वो सांस हूं.........

शेवटाला जाण्याची प्रत्येकाचीच धडपड असते. पण अपूर्णत्वाचा शाप हा सगळ्यांना कुठल्याना कुठल्या स्वरूपात छळतच असतो.  म्हणून शायर म्हणतोय मी तर असा श्वास आहे की तो अजून ओठावरपण आलेला नाही. तेवढ्यातच माझा हा छळ होतोय. याच्या वेदनासुध्दा माझ्या ह्रदयात भरल्या नाहीत तोच माझी जायची वेळ झाली ?
माझ्या शब्दांचा अर्थ अजून माझ्या नजरेत उमटतोय, ही शुभवार्ता मी अजून कोणाला दाखवलीही नाही. खलिफा म्हणजे प्रतिनिधी (माझ्या विचारांचे प्रतिनिधी माझे शब्द). निगाह म्हणजे नजर आणि मुज्दा म्हणजे असा शुभ शब्द
की जो पहिल्यांदा उमटतो किंवा लिहीला जातो. जसा आपला " श्री ".
आता माझ्या ह्रदयाची धडधड माझ्या शब्दावाटे बाहेर पडेल ( जन्म ) आणि तू तुझ्या मांडीवर मला अजून बसवलेपण नाहीस ( मोठे होणे) तेवढ्यात हे परमेश्वरा घेऊन जायची कसली घाई ?
 हे परमेश्वरा, तू एवढा का वैतागला आहेस या दुनियेला ? मी अजून तुझ्या प्रार्थनेसाठी माझे मस्तक झुकवलेले पण नाही...... सिजदा म्हणजे प्रार्थना...

अजून चांगला अर्थ लावता आला तर आपले स्वागत आहे.

जयंत कुलकर्णी.
येथे ऐका....