हसरतोंके मज़ार !
वाट बघण्यात अर्धी रात्र गेली. पहाटेची चाहूल लागत आहे पहाटेचा गारवा सगळीकडे जाणवतोय पण मला माझे एक क्षणभरही डोळे मिटून दिले नाहीस, काय म्हणावे तुला ? आतातरी मला जरा डोळे मिटू देत ! हे माझ्या धडधडणार्या, तडपणार्या ह्रदया मला जरा झोपू देत ! बास झालं हे वाट बघणं. यात वेदनेशिवाय काय आहे ?
एवढे तुला समजवून सांगितले तरी तू मात्र त्याची वाट बघतोच आहेस. जराशी तरी चाहूल लागली तरी तू परत जागा होतोस, तडपतोस, कसा विश्वास ठेवतोस तू या मायाजालावर ? तू झोप आणि मलाही झोपू देत बाबा आता ! याची वाट बघण्यात मला इतक्या वेदना झाल्यात की माझ्या डोक्यात या वेदनांची थडगी झालीत की काय असा मला संशय येतोय ! मला त्याच्या शिवाय काहीच सुचत नाही, मला कळतंय हे सगळे फसवे आहे, पण काय करू? या वाट बघण्याशिवाय मी काय करु शकते............
हो चूका इन्तज़ार सोने दे
ऐ दिल-ए-बेकरार सोने दे...
हो चूका इन्तज़ार सोने दे
आहटोंके फ़रेबमे मत आ
आहटोंके फ़रेबमे मत आ
उनका क्या ऐतबार सोने दे,
ऐ दिल-ए-बेकरार सोने दे
हो चूका इन्तज़ार सोने दे...........
बन गये थे हमारे सिनेमें
बन गये थे हमारे सिनेमें
हसरतोंके मज़ार सोने दे...
ऐ दिल-ए-बेकरार सोने दे
हे जे शब्द आहेत, त्याचा अर्थ आत कुठेतरी भिडायला असाच आवाज लागतो. ऐका हे गाणे, अशा आवाजात जो तुम्ही कधीही विसरु शकणार नाही. इकबाल बानोच्या आवाजात. फार गुणी गायीका होती ती. नुकतीच अल्लाला प्यारी झाली. भारतातून पाकिस्तानात गेल्यावर तिची फारशी कदर झाली नाही हे तिचे दुर्दैव ! तिची ७/८ गाणी आपल्याला माहीत असतीलच..........नसतील तर तुम्हाल ऐकवीन म्हणतो.....
जयंत कुलकर्णी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा