निराशेत मनात काय काय विचार येतात, खरंच सांगणे कठीण आहे. एकदा का मन निराशेच्या गर्गेत कोसळले की मग विचारायला नको. विचारच निराशांच्या वेढ्यात सापडले की मनाचा आभिमन्यू होतो. मग साहीर म्हणतो " हे जीवन जुलूम आहे, परमेश्वराच्या हातातील खेळणे आहे ( जब्र : सर्व काही देव तर करतो हा सिध्दांत), माझ्या ह्रदयाची तक्रार आहे, माझ्या आत्म्याचा विलाप आहे.... किती दु:ख सहन केले असेल ... दु:खाची परीसीमा गाठल्यावरच असे काव्य जन्माला येते.
नंतरच्या कडव्यात मनाची समजूत घातली आहे. आपले नशीबच असे असेल तर तक्रार कशाला ? सालिकेसे म्हणजे एखाद्या मुसाफ़ीराप्रमाणे उरलेले आयुष्य काढेन मी. माझ्या इच्छा आकांक्षांचा जर पदोपदी ठोकरल्या जाताएत तर त्यातून होण्यार्या वेदनांचे काय घेऊन बसलाय ....
दुख:त सुध्दा गत आयुष्यातल्या चांगल्या आठवणी तग धरुन मनात आहेत. त्याचाच आधार आहे आता.
आज अगर कापती पलकों को दिये है आंसू
कल थिरकती हुए होटों को हसी भी दी थी....
शेवटी माणूस निरशेच्या गर्गेतून छोट्याशा उजेडाच्या तुकड्याकडे बघतोच आणि त्याच्या मनाला परत एकदा पालवी फुटते. आशा निराशेचा खेळ हा असा असतो मित्रांनो !
ज़िंदगी ज़ुल्म सही जब्र सही गमही सही
दिलकी फ़रियाद सही रुहका मातमही सही
ज़िंदगी ज़ुल्म सही....
हमने हर हालमें जिनेकी कसम खाई है
अब यही हाल मुक्कदर है तो शिकवा क्यू हो
हम सालिकेसे निभा देंगे जो दिन बाकी है
चाह रुसवा ना हुई दर्दभी रुसवा क्यू हो
ज़िंदगी ज़ुल्म सही.....
हमको तकदीरसे बे वज़ह शिकायत क्यू हो
इसी तकदीरने चाहतकी खूषीभी दी थी
आज अगर कापती पलकों को दिये है आंसू
कल थिरकती हुए होटों को हसी भी दी थी....
जिंदगी जुल्म सही......
हम है मायूस मगर इतनेभी मायूस नही
एक ना एक दिन तो यह अष्कोंकी लडी तुटेगी
एक ना एक दिन तो छटेंगे यह गमों के बादल
एक ना एक दिन उजाले की किरन फुटेगी
जिंदगी जुल्म सही.....
ऐका आणि हरवून जा या गाण्यात आणि त्यातल्या भावनांमधे.............
कवी : साहीर लुधियानवी
संगीतकार : खय्याम.
गायीका : सुमन कल्यानपूर.
प्रत्येक कडव्याच्या शेवटी हवेत विरत जाणारी एक धून मला विलक्षण आवडते. गाण्याच्या शेवटी ती थोडा जास्त वेळ रेंगाळते. सुंदर, हळवा आवाज, जणू काही आपलेच गाणे कोणीतरी गातेय............
जयंत कुलकर्णी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा